बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

मुंबईहून लातूरला जात असलेल्या खासगी बसला आज पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला. आष्टीजवळील धानोरा गावाजवळ एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस 100 फूट दरीत कोसळली.

बीड - नगर-जामखेड रस्त्यावरील धानोरा घाटात आज (रविवार) पहाटे खासगी प्रवासी बसला पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जण ठार, तर 23 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या एका वळणावर कठडा नसल्याने खासगी प्रवासी बस खाली कोसळली. धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे आज पहाटे घडली. बीड येथील सागर बस या खासगी कंपनीची प्रवासी ट्रॅव्हल मुंबईहुन लातूरकडे जात होती. पहाटे चार वाजता आष्टी तालुक्यातील धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे बस आल्यावर पहिल्याच वळणाला कठडा नसल्याने बस सरळ रोडच्या खाली असणाऱ्या खड्डयात कोसळली. बसने चार पलट्या खाल्या. यामुळे बसमधील 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 26 जण जखमी झाले असून, त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते.

मृतांमध्ये रशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (वय 60 वर्ष, रा.भाराबाई गल्ली,आंबाजोगाई जि.बीड), अतीक खान मुनवार (वय 32 वर्ष, रा.खोती जवळा,पो.युसूफवडगांव ता.केज), मेहरुनिसा अमीन पटेल (वय 35 वर्ष, रा.89 सिराज हॉऊस सोनापूर भाडूप पश्चिम,मुंबई-78), असिमा नजीम सय्यद (वय 45 वर्ष, रा.89 सिराज हॉऊस सोनापूर भाडूप पश्चिम,मुंबई-78), सर्जेराव लक्ष्मण पवार (वय 30 वर्ष, रा.वाडीवाटा तांडा,पो.असरडोह ता.धारूर जि.बीड), योगेश गौतम टकले (वय 30 वर्ष, रा.चिखली ता.आष्टी,जि.बीड, पठाण बहादूर पठाण ईस्माल (वय 65 वर्ष, रा.बसमेश्वर महाविद्यालयासमोर,लातूर), सुनिल मल्हारी कुंभारकर (वय 45 वर्ष, रा.कर्वे नगर,ता.जि.पुणे) यांचा समावेश असून, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Web Title: Beed News private bus accident near Ashti