लोकअदालतीत तेवीसशे प्रकरणे निकाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

बीड - येथील जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात शनिवारी (ता. आठ) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दाखल पूर्व अशा एकूण ५ हजार १५० प्रकरणांपैकी २ हजार २९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ४३ कोटी ४२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या मदतीने ही लोकअदालत पार पडली.

जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‌घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष मंगेश पोकळे, जिल्हा सरकारी वकील अजय राख, जिल्हा सत्र न्यायाधीश संजीव कदम, जिल्हा सत्र न्यायाधीश बाबासाहेब वाघ, जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. गांधी, जिल्हा सह सत्र न्यायाधीश श्री. पौळ, जिल्हा सह सत्र न्यायाधीश हुद्दार, जिल्हा तदर्थ न्यायाधीश बेग, दिवाणी न्यायाधीश ताम्हणकर, मुख्य न्यायदंडाधिकारी खडसे, वकील संघाचे पदाधिकारी अमोल सर्वज्ञ, राहुल नवले, राजेंद्र नवले, कपिल भैरट, सारिका जोशी आदींची उपस्थिती होती. 

या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पानसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायालयात पार पडत असलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली निघत आहेत. त्यामुळे पुढील काळात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या कमी होईल, असे न्यायाधीशांनी या वेळी सांगितले. 

या वेळी लोकअदालतीत प्रलंबित व दाखल पूर्व अशा एकूण ५ हजार १५० प्रकरणांपैकी २ हजार २९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये भूसंपादन, धनादेश बाऊन्स प्रकरणे, मोटार अपघात, दिवाणी व फौजदारी यासह इतर प्रकरणांचा समावेश आहे. 

Web Title: beed news public court