बीड जिल्ह्यात 35 महसूल मंडळात अतिवृष्टी..!

दत्ता देशमुख
रविवार, 20 ऑगस्ट 2017

तालुकानिहाय पाऊस
​बीड -74.82 मि. मी, पाटोदा- 97.50, आष्टी-  62.86, गेवराई - 69.20, शिरूर का. -82, वडवणी- 59, अंबाजोगाई- 75, माजलगाव- 51, केज- 65.86, धारूर- 57, परळी- 58.40 

बीड : महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे जिल्हाभर जोरदार आगमन झाले. शनीवारी दुपारपासून सुरू झालेली पावसाची रिमझिम नंतर वाढत गेली अन रात्रभर बरसणाऱ्या पावसानमुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला. जिल्ह्यातील 35 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचले असून तलावांतील पाणी पातळीही वाढत आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे हे की, कालच्या शनिवारपर्यंत सरासरीच्या 38 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला होता.या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे.

 एक रात्रीत पावसाने सारी स्थिती बदलून टाकली आहे.बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 63 पैकी 35 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे .यात बीड तालुक्यातील म्हाळसजवळा वगळता सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली.
पुणे वेधशाळेचा अंदाज यंदा प्रथमच खरा ठरला असून या पावसामुळे खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. बीड, पाटोदा,गेवराई, शिरूर, अंबाजोगाई आणि केज या 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

अतिवृष्टी झालेले महसूल मंडळे :
बीड,
राजुरी न, 
पेडगाव, 
मांजरसुंबा,
चौसाळा, 
नेकनूर,
पिंपळनेर,
पाली, 
लिंबागणेश,
पाटोदा,
थेरला,
अमळनेर,
दासखेड, आष्टी
कडा,
धामणगाव,
टाकळसिंग,

गेवराई,
धोंडराई,
उमापूर,
जातेगाव,
शिरूर,
रायमोह,
तींतरवणी,

अंबाजोगाई,
घाटनांदूर
लोखंडी सावरगाव,
बर्दापुर,
विडा,
ह.पिंपरी,
बनसारोळा,
नांदूरघाट,
धारूर,
परळी,
सिरसाळा.

तालुकानिहाय पाऊस
बीड -74.82 मि. मी, पाटोदा- 97.50, आष्टी-  62.86, गेवराई - 69.20, शिरूर का. -82, वडवणी- 59, अंबाजोगाई- 75, माजलगाव- 51, केज- 65.86, धारूर- 57, परळी- 58.40 

औरंगाबादेत ४१.१ मिमी पावसाची नोंद
औरंगाबाद: शहरात शनिवारी (ता. १९) दुपारी वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उघडिप दिल्यानंतर रात्रभर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. रविवारी सकाळी पावसाने जोर धरला. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात मागील २४ तासांत चिकलठाणा वेधशाळेत ४१.१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

Web Title: beed news rain in beed