‘बिंदुसरा’ला अचानक पाणी; मोंढा मार्गे वळविली वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

बीड - रविवारी (ता.२७) सायंकाळी अचानक बिंदुसरा नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने हे पाणी पर्यायी रस्त्यावरील पुलावरून वाहू लागले, यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवून ती शहरातील मोंढा मार्गे वळविण्यात आली. 

या पर्यायी पुलावरील रस्त्यावरून कोणी वाहनधारकाने चुकून जाण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तेथे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गत आठवड्यात जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस झाला. महसूल विभागाने या अतिवृष्टीची नोंद घेतली होती. दोन दिवसांत एकूण ४२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने सिंदफणा, डोमरी, तलवार आदी नद्यांसह बीड शहरातून जाणारी बिंदुसरा नदीदेखील खळाळून वाहिली होती. घाटमाथ्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रविवारी सायंकाळी अचानक बिंदुसरा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. पाणी वाढल्याने सायंकाळी नदीपात्रावर जीर्ण झालेल्या मुख्य पुलालगत उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागले. याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेत बॅरिकेडस्‌ टाकून दोन्ही बाजूंची वाहतूक मोंढा रोडमार्गे वळविली. 

दरम्यान वेळीच सावधानता बाळगल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दरम्यान पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी हे पाणी पाहण्यासाठी बिंदुसरा नदीवरील पुलाकडे धाव घेत एकच गर्दी केली.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसरा नदी खळाळून वाहिली होती. नदीवरील पूल जुना झाल्याने त्याच्यालगतच्या तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी उभारण्यात आलेल्या पुलावरून गेल्या वर्षभरापासून वाहतूक सुरू आहे. 

Web Title: beed news rain bindusara river