मंत्री शिंदेंची बदनामी; पाटोद्यात एक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

बीड - राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी दादासाहेब मुंडे यांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 7) अटक केली. त्यांना अंमळनेर (ता. पाटोदा) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याच प्रकरणात अन्य एका व्यक्‍तीचेही नाव समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या दरम्यान "मीच मुंडे साहेबांचा वारसदार - राम शिंदे यांचे प्रतिपादन' असे बातमीवजा कात्रण सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. या व्यक्‍तव्याशी आपला काही संबंध नसल्याचे मंत्री शिंदेंनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. 

दरम्यान, दसरा मेळाव्यात याचे पडसाद उमटून शिंदें विरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे बदनामी केल्याची तक्रार मंत्री शिंदे यांनी सुरवातीला मुंबईत केली होती. त्यानंतर हा गुन्हा अंमळनेर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्‍याम पाळवदे यांनी दादासाहेब मुंडे यांना आज अटक करून अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Web Title: beed news ram shinde