सीआयडीकडून रमेश कदमांची शाही बडदास्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

बीड  - अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या आमदार रमेश कदम यांची पोलिस कोठडी सीआयडीने घेतली खरी; परंतु कदम यांना ठेवण्यासाठी आणि चौकशीसाठी कोणत्याही पोलिस ठाण्यापेक्षा सीआयडीच्या अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृह जास्त सोयीचे वाटले. कदाचित पोलिस ठाण्याच्या अथवा अधीक्षक कार्यालयाच्या कॅमेऱ्यांच्या नजरा चुकवून शाही बडदास्त ठेवणे शक्‍य होणार नाही, असे वाटल्यानेच आमदार रमेश कदम यांच्या चौकशी आणि मुक्कामासाठी सीआयडीने विश्रामगृह निवडल्याची चर्चा आहे. 

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांची बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे सीआयडीने पोलिस कोठडी घेतली आहे. रमेश कदम यांना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 18) मध्यरात्रीच बीडला आणले. त्यांची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. रमेश कदम हे न्यायालयीन कोठडीतून सीआयडीकडे आलेले असतानाही, विश्रामगृहात त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा उभा होता. विशेष म्हणजे न्यायालयात नेत असताना, अगदी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशीसाठी त्यांना सीआयडीचे अधिकारी शहर पोलिस ठाणे आणि अधीक्षक कार्यालयात नेत असतानाही कार्यकर्त्यांचा ताफा सोबत होता. यावर कडी म्हणजे रमेश कदम यांची सोय कोणत्याही कोठडीत न करता शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. तेथेच त्यांच्या खान-पानाचीही सोय करण्यात आली. गुरुवारी सकाळी विश्रामगृहातून त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.

Web Title: beed news ramesh kadam mla