कमिशन वाढीसाठी रेशन दुकानदार संपावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

बीड - अन्न महामंडळ स्थापन करून दुकानदारांना मासिक वेतन देण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने मंगळवारपासून (ता.१) संप पुकारण्यात आला आहे. यावेळी संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी यांना देण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. 

शासनाच्या वतीने स्वस्त दुकानदारांना तुटपुंजे कमिशन दिले जाते. यावर दुकानदारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही अन्न महामंडळ स्थापन करून दुकानदारांना मासिक ४५ हजार रुपये वेतन देण्यात यावे, दुकानाचे भाडे, स्टेशनरी खर्च, वीजबील, दुकानामध्ये एक नोकर देऊन त्यास मानधन देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने मंगळवारपासून जिल्ह्यात संप पुकारण्यात आला असून याअंतर्गत 

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना मंगळवारी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष के. के. खान, शेषेराव फावडे, सुमित डोंगरे, नाथराव मुंडे, बबन घोरफडे, प्रकाश देसरडा, विष्णू दांगट, भाई गर्जे, सुभाष सोळंके, किसन राख, के.आर.बांगर, बाबा मुंडे, भास्कर रकटे, तुकाराम हराळे, शिवाजी रकटे, अशोक गायके, किशोर परदेशी, बन्सी जोगदंड, राजेंद्र काटे, बाळासाहेब काळे, विष्णू निरडे, रमेश गंगाधरे, शाहू ढोळस, नवनाथ पवार, अमर ढोणे, विकास वायभट, उध्दव मुंडे, अनंत भावटनकर, खांडे, पीयुष मोरे, शेख मुख्तार, अरुण देशपांडे, भागवत काळे, पप्पू शिनगारे, बाळू वंजारे, परशुराम जाधव, दिगांबर गर्जे, समीभाई आदी उपस्थिती होते.

Web Title: beed news ration shop