तपेनिमगाव नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

टाकरवण - गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने गोदावरी पात्रातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद करण्याची गरज आहे. मात्र नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. 

तपेनिमगाव (ता.गेवराई) येथून गोदावरी पात्रातून दररोज जेसीबी, केणी व बोटीच्या साह्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. या भागातील वाळूमाफिया महसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता वाळूचोरी करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांत गोदावरी पात्रातील वाळूपट्ट्यांमधून ठेकेदारांनी व माफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याने गोदावरी काठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटली आहे. तपेनिमगाव येथील गोदावरी पात्रात जेसीबीच्या साहाय्याने मोठे खड्डे करून, या खड्ड्यांमध्ये यंत्रे बसविण्यात आली आहेत. या यंत्रांद्वारे नदीपात्रातील वाळू पाईपच्या साहाय्याने ओढून घेतली जाते. या यंत्रातून पाईपच्या साहाय्याने चाळलेली वाळू जेसीबीच्या मदतीने टिप्पर, ट्रॅक्‍टरमध्ये भरून दिली जात आहे. एका टिप्परसाठी ४ हजार रुपये तर ट्रॅक्‍टरसाठी ८०० रुपये घेतले जातात. 

Web Title: beed news Sand river

टॅग्स