बीडः प्रार्थनेच्या वेळी शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

माजलगाव (बीड) : तालुक्यातील सोन्नाथडी केंद्राअंतर्गत असणा-या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल ज्ञानोबा येळणे वय 28) यांचा हृदयविकाराच्या धक्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (गुरूवार) घडली.

माजलगाव (बीड) : तालुक्यातील सोन्नाथडी केंद्राअंतर्गत असणा-या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल ज्ञानोबा येळणे वय 28) यांचा हृदयविकाराच्या धक्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (गुरूवार) घडली.

सुनिल ज्ञानोबा येळणे (रा. रामेश्वर ता. जिंतुर जि. हिंगोली) हे तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवर मराठी विषयाचे शिक्षक म्हणुन काम पाहतात. ते राहण्यास शहरात आहेत. आज नेहमीप्रमाणे ते सकाळी शाळेसाठी सोमठाणा येथे गेले होते. मैदानावर प्रार्थना झाल्यानंतर परिपाठ झाला. त्यावेळी त्यांना छातीत अचानक कळ आल्याने त्यांनी सहका-यांना सांगीतले व ते खुर्चीवर बसले. तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. इतर शिक्षकांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये आणले. परंतु, त्यांचा मृत्यु झाला होता.

शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचे मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वीच सुनिल येळणे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या या दुर्देवी मृत्यु बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: beed news school time of prayer the heart attack teacher dies