बीड: कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या महिलांचे मुंडन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "टरबुज्या मुख्यमंत्र्याचे करायचे काय खाली मुंडके वर पाय" अशा घोषणा देण्यात आल्या.

बीड - शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी संपमध्ये शिवसेनेने सक्रिय सहभाग घेतला. आज (बुधवारी) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुंडन करून निषेध केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "टरबुज्या मुख्यमंत्र्याचे करायचे काय खाली मुंडके वर पाय" अशा घोषणा देण्यात आल्या.

महिला आघाडीच्या ऍड संगीता चव्हाण व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी डोक्यावरचे केस काढून मुंडन केले. जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हा प्रमुख जयसिंग चुंगडे, गणेश वरेकर, गणेश उगले, उल्हास गिराम, परमेश्वर सातपुते, सुनील अनभुले, सुनील गवते आदींची उपस्थिती होती. सरकार व मंत्र्यांच्या विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
कर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​

Web Title: beed news Shiv Sena agitation against government