माजलगावात रावते यांच्या नावाने जागरण गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी सातवा वेतन लागू नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आणखी 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागु होणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्यावरून एसटी कर्मचारी संतप्त झाले.

माजलगाव (जि. बीड) : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी माजलगांव बसस्थानक परिसरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने आज (गुरुवारी) जागरण गोंधळ घातला. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी सातवा वेतन लागू नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आणखी 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागु होणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्यावरून एसटी कर्मचारी संतप्त झाले. सदरील संप काँग्रेस प्रणित असल्याचा आरोप  रावते यांनी केला आहे.

एसटीच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतूक दरांनी दर वाढवून मनमानी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाच्या माजलगांव आगारातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत गुरुवारी यांच्या नावाने जागरण गोंधळ घातला.

Web Title: Beed news ST workers strike in Majalgaon