आत्महत्या थांबविण्यासाठी सिंचन सुविधेची मात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

बीड - जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे त्यांचे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, अन्‌ शेतकरी आत्महत्यांचे सत्र आपोआप कमी होईल, असे मत व्यक्त करीत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.१२) झालेल्या ‘शेतकरी आत्महत्या- मिशन दिलासा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त सीईओ धनराज नीला, प्रगतिशील शेतकरी श्री. बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर पडला नाही तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. जिल्ह्यात मागील काही वर्षात सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली. यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांची ससेहोलपट होऊ नये, यासाठी विविध योजनांच्या माध्यमांतून त्यांना जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधांबरोबरच पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत, विविध उपकरणांचे वाटप त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी संबंधितांना दिले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: beed news suicide irrigation farmer