थंडपेयाला नागरिकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

बीड - सध्या तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले असून, शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानामुळे जीवाची लाही-लाही होत आहे. गरमीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उसाच्या थंड रसाला पसंती देत आहेत. 

बीड - सध्या तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले असून, शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानामुळे जीवाची लाही-लाही होत आहे. गरमीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उसाच्या थंड रसाला पसंती देत आहेत. 

आठ दिवसांपूर्वी तापमान ३३ पर्यंत खाली आले होते. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा वाढ झाली आहे. शहरातील तापमान मंगळवारी ३९ च्या पुढे गेले. शहरातील बसस्थानकातील रसवंतीवर दुपारी प्रवाशी रस पिण्यासाठी धाव घेत आहेत. उष्णता वाढल्याने रस्त्यावर दुपारच्या वेळेत शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. नागरिक सकाळी व सायंकाळीच महत्त्वाची कामे करून घेत आहेत. बाजारपेठही शांत झालेली दिसते. सध्या रसवंतीगृह चालकांचा व्यवसाय वाढला आहे.

Web Title: beed news summer sugarcane juice