उन्हाचा पारा चढताच वाढली माठांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

बीड - सध्या सर्वत्र तापमान वाढत असून सर्वसामन्यांचा फ्रीज म्हणून ओळख असणाऱ्या माठाची ग्रामीण भागातून मागणी वाढू लागली आहे. शहरातही माठ विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढले असून सध्या जिल्ह्यातील तापमान ३९ च्या पुढे जाऊ लागले आहे.

 शहरातून दररोज हजारो माठ खरेदी केले जात आहेत. शहरात उन्हाळ्यात फ्रीजच्या पाण्याला पसंती दिली जाते, तसेच ग्रामीण भागातील नागरिक माठाच्या पाण्याला जास्त पसंती देत आहेत. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून या दोन महिन्यांत जास्त गरमी असण्याची शक्‍यता आहे. 

दोनशे रुपयांपर्यंत किंमत
सध्या उन्हाचा पारा वाढला असून सर्वत्र गरमी जाणवू लागली आहे. माठाची किंमत शंभर ते दोनशे रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत माठांची किंमत सारखीच आहे.

Web Title: beed news summer temperature