उपनगराध्यक्षांसह आघाडीचे दहा नगरसेवक बीडमध्ये अपात्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

बीड - नगराध्यक्षांच्या दालनात आणि खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह काकू - नाना आघाडीच्या एकूण 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी (ता. 19) दिला. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना सहा वर्षे, तर इतर नगरसेवकांना पाच वर्षे नगरपालिका निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली. 

दरम्यान, सदस्यांना अपात्र ठरविले असले तरी या सदस्यांना लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान करता येणार आहे. 

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे स्वच्छता समितीचे सभापती होते. दरम्यान, गेल्या वर्षी ता. 27 जूनला त्यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शहरातील स्वच्छतेवरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कक्षामध्ये आणि त्यांच्या खुर्चीवर कचरा टाकला. या नगरसेवकांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यावरून त्यांचे नगरसेवकपद अपात्र ठरविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने याची चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करावी, असे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. यावरून या प्रकरणाची सुनावणी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर होऊन शुक्रवारी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह इतर नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये हेमंत क्षीरसागर यांना सहा वर्षे, तर उर्वरित नऊजणांना पाच वर्षे नगरपालिका निवडणूक लढविण्यास निर्बंध घालण्यात आला. दरम्यान, हा अपात्रतेचा निकाल काकू - नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. 

या दहा नगरसेवकांना ठरविले अपात्र 
उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक प्रभाकर पोपळे, सय्यद फारुक अली नुसरत अली, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्‍मी इद्रिस अहमद, मोमीन अजहरोद्दीन मोमीन नैमुद्दीन, रणजित बनसोडे या नगरसेवकांचा अपात्र ठरविलेल्यांमध्ये समावेश आहे. 

परवाच्या निवडणुकीत करता येणार मतदान 
दरम्यान, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोवमारी (ता. 21) मतदान आहे. या निवडणुकीची मतदान यादी ता. तीन मेरोजी अंतिम झालेली आहे. त्यात नावे असलेल्या सर्वांनाच मतांचा अधिकार असेल. त्यामुळे या अपात्र नगरसेवकांनाही या निवडणुकीत मतदान करता येईल.

Web Title: beed news Ten corporators ineligible in Beed