हवाई दलातील कर्मचाऱ्याची  वाहतूक पोलिसाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

बीड, - वाहन तपासणी दरम्यान हवाई सेनेत कार्यरत एका कर्मचाऱ्याने वाहतूक पोलिसास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २७) बीडमध्ये घडली. गोरक्षनाथ मनोहर दराडे यांनी पोलिस कर्मचारी विजय दिगांबर आघाव यांना मारहाण केली.

बीड, - वाहन तपासणी दरम्यान हवाई सेनेत कार्यरत एका कर्मचाऱ्याने वाहतूक पोलिसास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २७) बीडमध्ये घडली. गोरक्षनाथ मनोहर दराडे यांनी पोलिस कर्मचारी विजय दिगांबर आघाव यांना मारहाण केली.

शहर वाहतूक शाखेतील विजय आघाव हे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर होते. या वेळी त्यांनी गोरक्षनाथ दराडे (रा. खंडाळा, ता. बीड) याची दुचाकी थांबवून वाहन चालविण्याचा परवाना व दुचाकीची कागदपत्रे मागितली. कागदपत्रे घरी असल्याचे दराडेने सांगितले; मात्र याच मुद्यावरून दोघांत शाब्दिक वाद वाढून गोरक्षनाथ दराडे याने विजय आघाव यांना मारहाण केली. त्यानंतर आघाव यांनी त्यास पकडून ठेवत इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. गोरक्षनाथ दराडे भारतीय हवाई सेनेत टंकलेखक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अढथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. फौजदार बी. डी. सोनार तपास करीत आहेत. दरम्यान, गोरक्षनाथ दराडे यांनीही निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्याकडे आपल्यालाही मारहाण झाल्याचा तक्रार अर्ज दिला. विजय आघाव यांच्यावर कारवाई करावी, तसेच पोटात वेदना होत असल्याने उपचार करावेत, अशी मागणीही केली. त्याचा अर्ज चौकशीसाठी ठेवला आहे.

Web Title: beed news Traffic Police beat

टॅग्स