वैद्यनाथचा परवाना निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

बीड - अन्न व औषधी प्रशासनाला आढळलेल्या त्रुटींची 88 दिवसांच्या मुदतीतही पूर्तता न केल्याने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. त्यानुसार 11 ते 20 एप्रिलदरम्यान, कारखान्याला गाळपासह कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाही. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. मुंबई येथील गुप्त वार्ता विभागाच्या पथकाने 16 डिसेंबरला कारखान्याला भेट दिली होती.
Web Title: beed news vaidyanath sugar factory permit suspend