स्वयंपाकातून भाजीपाला गायब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बीड - परतीच्या पावसाने भाजीपाला खराब झाल्याने भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. ग्राहकांनी भाजी मार्केटकडे पाठ फिरविली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने शेवटच्या सत्रात नुकसान झाले. परतीच्या पावसाने शेतमाल खराब झाला. जो माल मार्केटमध्ये येत होता, त्याची आवक कमी झाली. सध्या भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले आहेत. पाऊस अधिक झाला तरी शेतकरीही चिंताग्रस्त आहेत. शेतातील भाजीपाला चांगला आला होता; पण परतीच्या पावसाने नुकसान केले. टोमॅटो, वांगे, कांद्याचे भाव वीस ते तीस रुपये होते. आता साठ ते सत्तर रुपये किलो झाले आहेत.

Web Title: beed news vegetables

टॅग्स