थंडीचे चोरपावलाने आगमन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बीड - जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात सर्वत्र परतीचा पाऊस झाल्याने वातावरणात काही भागात पाणीसाठा झाला असून, वातावरणातही बदल होत आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. सध्या थंडीचे चोरपावलाने आगमन झाले आहे. तीन-चार दिवसांपासून बीड शहरासह सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. त्यामुळे बाजारात गरम कपडे खरेदीसाठी नागरिक येत आहेत. 

लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत विविध प्रकारचे स्वेटर बाजारात आले आहेत. तीनशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत स्वेटरच्या किमती आहेत. 

बीड जिल्ह्याने सतत तीन वर्षांचा दुष्काळ सोसला आहे. तीन-चार वर्षांत थंडी कमी प्रमाणात होती; मात्र यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. यामुळे यंदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता आहे. याची चाहूल तीन दिवसांपासून लागलेली दिसून येत आहे. रात्री ते सकाळपर्यंत तापमान हे वीसवर येत आहे. यामुळे रात्री व सकाळी थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम कपडे वापरू लागले आहेत. शहरातील सुभाष रोडवर स्वेटर खरेदीसाठी दुकाने सजली आहेत.

Web Title: beed news winter

टॅग्स