महिलेची उपोषणस्थळीच प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

बीड - उपोषणस्थळीच प्रसूती झाल्याची घटना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. १९) उघडकीस आली. विशेष म्हणजे संबंधित मातेने अर्भकासमवेत उपोषणातील सहभाग कायम ठेवला आहे. सुरेखा शिवाजी पवार असे या मातेचे नाव आहे. वासनवाडी (ता. बीड) येथील सुबराव मोतीराम काळे व इतर १६ कुटुंबे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ मार्चपासून उपोषणाला बसली आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत वासनवाडी शिवारातील पारधी वस्तीवरील पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. 

Web Title: beed news women delivery