गुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

बीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराची कामगिरी सरस ठरली आहे. 

खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आणि दरोडा अशा प्रकरणांची पोलिसांनी शंभर टक्के उकल केली आहे; तर मकोका आणि एमपीडीए नुसार कारवायांमध्ये बीड पोलिस दलाची कामगिरीही अव्वल राहिली आहे. यात जिल्हादंडाधिकारी वा प्रांताधिकाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची म्हणावी लागेल. यापूर्वी अशी प्रकरणे दंडाधिकाऱ्यांकडे प्रलंबित राहत. 

उपराजधानी नागपूर येथे ता. 13 ते 18 जानेवारी या काळात महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या दरम्यान ता. 17 जानेवारीला पोलिस महासंचालकांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा परिषद झाली. यामध्ये पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हा पोलिस दलाच्या सरत्या वर्षाच्या कामगिरीची माहिती सादर केली. पोलिस दलातील एक ते 15 गुन्हे प्रकरणांची उकल करण्यात बीड पोलिस दल राज्यात प्रथम आले आहे. याचे प्रमाण 83.72 टक्के एवढे आहे. जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात बीडने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याचे प्रमाण 83.05 टक्के एवढे आहे. 

मकोका-एमपीडीएत अव्वल 
संघटित गुन्हेगारी करण्याच्या प्रकारांवर पायबंद घालण्यासाठी अशा टोळ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. पोलिस दलाने चार टोळ्यांतील 19 आरोपींविरुद्ध याअंतर्गत कारवाई केली. यात बीड राज्यात पाचवे आणि मराठवाड्यात प्रथम राहिले. तर, एमपीडीए अंतर्गत 13 आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करत बीडने राज्यात दुसरा आणि मराठवाड्यात पहिला क्रमांक मिळविला. 

या गुन्ह्यांची शंभर टक्के उकल 
खुनाचा प्रयत्न - अशा गुन्ह्यांची शंभर टक्के उकल. 

बलात्कार - अशा गुन्ह्यांची शंभर टक्के उकल. 

विनयभंग - अशा गुन्ह्यांची शंभर टक्के उकल. 

दरोडा - अशा गुन्ह्यांची शंभर टक्के उकल. 

अशा गुन्ह्यांच्या उकलीतही अव्वल 
खून - गतवर्षीच्या प्रमाणात सरत्या वर्षात आठ खून कमी. राज्यात चौथा आणि मराठवाड्यात प्रथम क्रमांक. 

जबरी चोरी - जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण 83 टक्के असून राज्यात तिसरे आणि मराठवाड्यात प्रथम. 

रात्रीची घरफोडी - अशा गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण 45.38 टक्के असले तरी राज्यात सर्वाधिक आहे. 

दिवसाची घरफोडी - अशा गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण 44.44 टक्के असून यातही राज्यात जिल्हा चौथा आणि मराठवाड्यात पहिला ठरला आहे. 

चोरी - अशा गुन्ह्यांमध्ये मागच्या वर्षीपेक्षा 75 गुन्ह्यांची घट झाली असून यात बीड राज्यात दुसरे आणि मराठवाड्यात पहिले ठरले आहे. 

प्रतिक्रिया 
मागच्या वर्षीप्रमाणेच बीड पोलिस दलाची कामगिरी यंदाही चांगली राहिली असून पुढेही अशीच राहिल, असा विश्वास आहे. याचे श्रेय सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. 
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड. 

Web Title: Beed police tops in the list of solve crimes