esakal | पंकजांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, 'चांगला विकास करा', धनंजय मुंडेनीही दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde and dhanajay maunde

पंकजा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दोघे बहीण भाऊ कीर्तनाच्या कार्यक्रमात दिसत आहेत

पंकजांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, 'चांगला विकास करा', धनंजय मुंडेनीही दिलं उत्तर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

बीड: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी ज्यांच्या हातात सत्ता मिळाली आहे ते नक्कीच विकास करतील असं म्हणत बंधू धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जवाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू.

जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ शुक्रवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विरोधासाठी विरोध न करता सामाजिक निर्णय, कार्यक्रमात ही भावंड एकत्र आल्याचं दिसत होतं.

सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यकारी अध्यक्ष! जाणून घ्या...

पंकजा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दोघे बहीण भाऊ कीर्तनाच्या कार्यक्रमात दिसत आहेत. प्रत्येक वर्षी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी धनंजय मुंडे येत असतात. यंदाही ते आले होते. संत वामनभाऊ यांच्या महापूजेच्या वेळी मुंडे उपस्थित होते. या प्रसंगी गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह भाविक उपस्थित होते.

हिंगोलीत पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा 

बैठक गाजली-
नुकतीची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडेंनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना बैठकीतून हाकलून लावले होते. तसेच नियोजन समितीच्या सदस्यांना तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मुंडेंच्या उपस्थितीत गुट्टे यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला होता.

(edited by- pramod sarawale)