
माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱयावर आहेत
बीड: माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱयावर आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजा मंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ध्वजारोहण केले. आजच्या कार्यक्रमाचे फोटोही मुंडे यांनी समाज माध्यमावर टाकले आहेत.
आजच्या बीडच्या दौऱ़्यात पंकजा मुंडे यांनी माजलगावकडे प्रवास करताना रस्त्यावरील दुकानात जाऊन उसाच्या आस्वाद घेतला. याबद्दलची माहितीही मुंडे यांनी ट्विटरवरून दिली. 'माजलगावकडे जात असताना टालेवाडी फाटा येथे श्री गणेश बडे यांच्या ‘गारवा’ रसवंती गृहाला भेट देऊन उसाचा रस पिण्याचा आनंद घेतला”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
माजलगावकडे जात असताना टालेवाडी फाटा येथे श्री गणेश बडे यांच्या 'गारवा' रसवंती गृहाला भेट देऊन उसाचा रस पिण्याचा आनंद घेतला. pic.twitter.com/YF6dmJGmLU
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2021
दौलताबाद किल्ल्यावर गर्दीच गर्दी! किल्ल्यावरील पर्यटकांना खालीच येता येईना...
ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार-
प्रवासादरम्याना पंकजा मुंडे यांनी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कारही केले. “नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ग्राम पंचायतची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज नियोजित कार्यक्रमानिमित्त माजलगावकडे जात असताना चोपनवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांनी भेट घेऊन सत्कार केला”, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ग्राम पंचायतची निवडणूक बिनविरोध पार पडली.आज नियोजित कार्यक्रमानिमित्त माजलगावकडे जात असताना चोपनवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांनी भेट घेऊन सत्कार केला. pic.twitter.com/dKtkrgkOES
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2021
(edited by- pramod sarawale)