बीड : ज्येष्ठ पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

तत्पूर्वी सेल्फी काढून छायाचित्र केले सोशल मीडियावर व्हायरल
Suicide selfie viral on social media
Suicide selfie viral on social mediasakal

परळी वैजनाथ : शहरातील ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम (वय ७०) यांनी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी सेल्फी काढून त्यांनी हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यात सायकल फेरी काढून एड्स जनजागृतीचे काम केले. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमातही ते सक्रिय सहभागी होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते राज्य सदस्यही होते. मंगळवारी त्यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्‍महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले होते. ते पाहून काही जण त्यांच्या घरी गेले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. बुधवारी (ता.१५) विच्छेदनानंतर त्यांच्यावर सार्वजनिक स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com