पीकविमा भरून घेण्यात देशात बीड अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

बीड - शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असून शनिवारी (ता. 21) जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. एल. चपळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सन्मान करणार आहेत. 

बीड - शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असून शनिवारी (ता. 21) जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. एल. चपळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सन्मान करणार आहेत. 

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्यांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये बीड, नांदेड आणि तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यांचा समावेश होता. 2016-17 आणि 2017-18 मध्ये सर्वाधिक विमा बीड जिल्ह्याने भरला अन्‌ त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला. 2016-17 या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातून 55 कोटी 46 लाख विमा रक्कम भरण्यात आली होती. त्याबदल्यात पीकविम्यापोटी तब्बल 233 कोटी 84 लाख रुपये असा भरघोस निधी जिल्ह्याच्या पदरात पडला. याशिवाय 2017-18 च्या खरीप हंगामात 63 कोटी 71 लाख, तर रबी हंगामात 8 कोटी 44 लाख रकमेचा विमा भरण्यात आला. या कामगिरीमुळे जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे. 

2016-17 मध्ये पीकविमा ररक्कम भरून घेण्यासाठी कृषी सहायकापासून, क्षेत्रीय कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ते जिल्हा कृषी अधीक्षकापर्यंतच्या अधिकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. काही ठिकाणी विमा भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांसाठी अल्पोपाहाराचीही सोय करण्यात आली. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सोहळा पार पडणार आहे. 

पाठपुरावा आला कामी 
पीकविमा भरण्यास सुरवात झाल्यापासून ते अखेरच्या मुदतीपर्यंत ही मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अधिकचा विमा भरून घेण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. या काळात रविवारीही बॅंका सुरू ठेवण्यात आल्या. महसूल कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन झाल्यानेच ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली. आढावा बैठकांपासून ते वेळोवेळी केलेला पाठपुरावाच कामी आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. 

Web Title: beed tops in the country to fill the crop insurance