जिल्ह्यात गट, गणांसाठी 2694 अर्ज 

जिल्ह्यात गट, गणांसाठी 2694 अर्ज 

बीड - जिल्हा परिषदेच्या 60 गटांसाठी व 120 पंचायत समिती गणांसाठी आगामी 16 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून (ता.27) ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी (ता.1) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील 60 गटांसाठी 959, तर 120 गणांसाठी 1735 अर्ज असे एकूण 2694 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. 

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शुक्रवारपासून (ता.27) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दोन दिवसांत एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. रविवारी (ता.29) गटासाठी 1, तर गणासाठी 3 अशा एकूण 4 अर्जांची नोंद झाली. सोमवारी (ता.30) इच्छुकांनी अर्ज भरण्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ करीत दिवसभरात गटांसाठी 46, तर गणांसाठी 47 असे एकूण 93 अर्ज दाखल केले. मंगळवारी (ता.31) दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी 192, तर पंचायत समितीसाठी 326 असे 518 अर्ज आले. बुधवारी (ता.1) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 719, तर पंचायत समितीसाठी 1359 असे एकूण 2 हजार 78 अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 60 गटांसाठी 959, तर 120 गणांसाठी 1735 असे दोन्ही मिळून एकूण 2694 अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बीड तालुक्‍यातून सर्वाधिक 437 अर्ज दाखल झाले आहेत. वडवणी तालुक्‍यातून सर्वात कमी 81 अर्ज दाखल झाल्याची नोंद आहे. बहुतांश ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही ठिकाणी स्थानिक आघाडींच्या उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे सर्वच ठिकाणी निवडणुकीची चुरस वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com