आई-बाबा, नवीन वर्षांचे गिप्ट द्यायचे तर शाळेला द्या ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

गेवराई - आम्ही खूप अभ्यास करावा, मोठे व्हावे यासाठी तुम्ही नवीन वर्षांच्या कृतिशील शुभेच्छा देणारच आहात; मात्र आमच्या शाळेलाही शुभेच्छा आणि गिप्ट हवे आहे. शाळेत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागासोबत तुमचीही साथ हवी आहे, असा आर्जव केला तो तालुक्‍यातील तळणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी. त्यासाठी त्यांनी आपल्या हस्तकलेतून नवीन वर्षांच्या शुभेच्छापत्रांची निर्मिती केली. त्यात त्यांनी शाळेतील अडचणी मांडल्या. 

गाव खेड्यातील शाळा म्हटले की, अडचणी आल्याच; पण गाव आपले आहे. गावातील शाळेत शिकणारी मुलेसुद्धा आपली आहेत. त्यामुळे शाळेत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जबाबदारीसुद्धा शासनाएवढी आपलीच आहे. हाच संदेश तळणेवाडीच्या चिमुल्यांनी शुभेच्छापत्रातून दिला. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत; मात्र शाळेत पेयजल, वीजपुरवठ्याची सुविधा नाही. एकीकडे देश डिजिटल होत आहे; पण या ठिकाणी ई-लर्निंग कक्ष नाही. या समस्या शाळेतील चिमुकल्यांनी स्वतः ग्रीटिंग्ज्‌ बनवून मांडल्या. त्यांनी आपले आई-वडील, काका- काकू, शेजारी, मोठा दादा, ताई, आजी-आजोबा यासह शिक्षक, मुख्याध्यापक, प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडे शाळेतील गैरसोय दूर करण्याचे "गिप्ट' मागितले. गावातील सर्वच व्यक्तींनी लोकवर्गणीतून शाळेला मदत करावी, अशी मागणी केली. शिवाय गावात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करा; पण मोठमोठे भोंगे लावून त्यातून ध्वनिप्रदूषण करू नका. आपण मनातल्या मनात केलीली प्रार्थनाही देव ऐकतो. त्याला मोठ्या आवाजाची आणि जाहीर प्रदर्शनाची गरज नाही, असा संदेशही चिमुकल्यांनी आपल्या आप्तांना दिला. 

असे केले भेटकार्ड 
मुलांनी विविध रंगीबेरंगी कागद, टिकल्या, लेस, जुन्या लग्नपत्रिका यांचा वापर करून अतिशय दर्जेदार असे भेटकार्ड बनविले. त्यावर शाळेत असलेल्या अडचणी तर मांडल्याच; पण आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यासाठी त्यांना मुख्याध्यापक चिंतामण गवळी, शिक्षक कैलास शेजाळ, अभय देशपांडे, नितीन गवळी, महादेव कारंडे, जयश्री भट, अश्विनी पवार, ज्योती कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. 

Web Title: beed zp school