हिंगोली : गोमांस घेऊन जाणार टेम्पो जमावाने फोडला

hingoli
hingoli

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सावरखेडा शिवारात गोमांस घेऊन जाणारा टेम्पो संतप्त जमावाने फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) सकाळी आकरा वाजता घडली आहे. यावेळी जमावाने केलेल्या रास्ता रोको मुळे कळमनुरी मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. 

अकोला येथून एका ट्रकमधे गोमांस नांदेडकडे नेले जात असल्याची माहिती सावरखेडा (ता. हिंगोली) येथील गावकऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासूनच तरुण मंडळी टेम्पो थांबविण्यासाठी रस्त्यावर उभी होती. सकाळी आकरा वाजता टेम्पो आल्यानंतर तरुणांनी चालकास टेम्पो थांबविण्याची सुचना केली. त्यानंतर टेम्पो थांबविल्यानंतर आत काय आहे याची माहिती विचारली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त  जमावाने टेम्पोवरील ताडपत्री काढून पाहिले असता त्यात गोमांस आढळून आले तसेच गाय व बैलांचे डोके देखील दिसून आले. त्यामुळे जमावाने बासंबा पोलिसांशी संपर्क साधला.

मात्र पोलिसांना येण्यास वेळ लागत असल्याने जमावाने टेम्पोच्या काचा फोडून रास्तारोको सुरु केला. या धावपळीमधे टेम्पोच्या चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला. रस्तारोको मुळे हिंगोली येथून कळमनुरीकडे जाणारी व कळमनुरीकडून हिंगोलीकडे येणारी वाहने अडकून पडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, कृष्णा चव्हाण, आनंद मस्के, कैलास पवार, जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर बासंबा व कळमनुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पो (क्र. एमएच - 30 -ई-5770) बासंबा पोलिस ठाण्यात नेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

रुग्णवाहिकेला केला रस्ता मोकळा
सावरखेडा येथे रास्तारोको सुरु झाल्यानंतर कळमनुरीकडून एक रुग्णवाहिका आली. मात्र तेथे असलेल्या तरुणांनी तसेच गावकऱ्यांनी धावपळ करुन रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देत माणुसकीचा प्रत्यय दाखवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com