परभणी : मधमाशांचा ग्रामस्थांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर अचानक आग्या मोहळाच्या मधमाशांचा समूहाने हल्ला करीत सुमारे पंधरा जणांना चावा घेतल्याची घटना तालुक्यातील निळा येथे घडली.

पूर्णा  : अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर अचानक आग्या मोहळाच्या मधमाशांचा समूहाने हल्ला करीत सुमारे पंधरा जणांना चावा घेतल्याची घटना तालुक्यातील निळा येथे (ता .28 ) घडली तर एक मुलगा या घटनेत जखमी झाला आहे. 

निळा (ता .पूर्णा) येथील लोचनाबाई विश्वनानाथ सुर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी गावातील नागरिक स्मशानभूमी येथे जमले होते  दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक त्या परिसरातील पिंपळाच्या झाडावरील आग्या मोहळाच्या मधमाशीच्या समूहाने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांवर हल्ला केला. या घटनेत मधमाश्यांनी वीस जणांना चावा घेतला.

दरम्यान, अंत्यविधी पटकन उरकून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या मधमाश्यांनी लक्ष्य केले, तर एका मुलगा व इतर दोघांना पाच ते सहा ठिकाणी चावा घेतल्याने ते जखमी असून, उपचारासाठी त्यांना परभणी येथे अॅ़मीट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bees attack on villagers in parbhani district

टॅग्स