कोतवालांनी परभणी जिल्हा कचेरीसमोर मागितली भीक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

परभणी : शासकीय तिजोरीवर भार पडत असल्याचे शासनाने वारंवार सांगून कोतवालांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. 17) कोतवालांनी जिल्हा कचेरीसमोर अनोखे भीकमागो आंदोलन केले. त्यातून जमा झालेली रक्कम शासकीय तिजोरीत भर टाकण्यासाठी पाठविणार असल्याचे उपासाहात्मक वक्तव्य आंदोलकांनी केले. 

जिल्ह्यातील कोतवालांनी 6 डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले. त्याच दखल अकरा दिवसानंतरही घेतली नसल्याने कोतवालांनी वेगळे आंदोलन हाती घेतले. आंदोलनस्थळी कोतवालांनी रूमाल अंथरून त्यावर पाच कटोरे ठेवून भीक मागितली. स्वतः त्यांनी कटो-यात पैसे टाकले. यातून जमा झालेली रक्कम शासकीय तिजोरीत भर टाकण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे कोतवालांनी सांगितले. अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, त्यांनी शासनाचा निषेध करीत शासनाविरूद्ध घोषणाबाजी केली. चतुर्थ श्रेणीची मागणी हक्काची असल्याचे कोतवालांनी नमूद अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. ज्ञानेश्वर बुलबुले, संतोष रानगीरे, माणिक गिरी, रामेश्वर कनले, हनुमान राऊत, दत्ता पांचाळ, मुंजा जुंबडे, रामजी शिरसेवाड, दत्तोपंत वाघमारे यांच्यासह जिल्हाभरातील कोतवाल संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  

Web Title: beggars agitation by kotwal at parbhani district office

टॅग्स