Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याची अशी झाली झाली सुरवात

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याची अशी झाली झाली सुरवात

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे होणारे दुर्लक्ष आणि कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचे निमित्तच एक मोठा उभा होण्यास कारणीभुत ठरले.

औरंगाबादेतूनच पहिला "मराठा क्रांती मूक मोर्चा' निघाला. त्यात अनेक चांगले पायंडे पाडले. अभिनंदनास पात्र ठरलेल्या त्या मोर्चाचे अनुकरण झाले नसते तर नवलच. त्यानंतर क्रांती मोर्चाचे हे लोण राज्यभर पसरले. परिणामी मोर्चाबाबत पुढील वाटचालीची सूत्रे इथूनच हलली. यानिमित्त "मराठा क्रांती मूक मोर्चा'चे वर्तुळ पुर्ण होत केंद्रबिंदू औरंगाबाद ठरले. 

कोपर्डी (जि. नगर) घटना घडल्यानंतर मराठा समाजाच्या संतापाचा कडेलोट झाला. नगर जिल्ह्यातील घटना असल्याने तेथील मराठा संघटनांनी निदर्शने केली. मात्र, या घटनेचे गांभिर्य ओळखून नगरला लागूनच असलेल्या औरंगाबादेतही घटनेचा निषेध व्यक्‍त करण्याचे ठरले. मराठा संघटनांची पहिली छोटेखानी बैठक तीन ऑगस्ट 2016 रोजी पार पडली. दोनच दिवसात पुन्हा दुसरी बैठक झाली. समाजातील आमदार, खासदारांची उपस्थिती होती. दोन दिवसाच्या अंतराने पत्रकार परिषद झाली. नऊ ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबादच्या क्रांती चौकातून "मराठा क्रांती मूक मोर्चा' निघाला. या मोर्चासाठी वापरलेली पद्धत हेवा वाटावा अशीच होती. शिस्तबद्ध मोर्चासह निर्माण केलेले वेगवेगळे पायंडे नजरेत भरणारेच ठरले. 

मराठा क्रांती मूक मोर्चाचा "औरंगाबाद पॅटर्न' चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर एकामागून एक मोर्चे जिल्हा पातळीवर निघू लागले. राज्याबाहेर तसेच परदेशातही मोर्चे निघाले. नेतृत्वाविना निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे नऊ ऑक्‍टोबरला पुन्हा राज्यव्यापी बैठक झाली तीही औरंगाबादेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश येथील मोर्चाचे प्रतिनिधी सहभागी झाले. 14 डिसेंबर 2016 रोजी नागपुरला मोर्चा काढायचे ठरले. याचवेळी मराठा आरक्षणासाठी तज्ज्ञांची राज्य समिती नेमण्यात आली. 

नागपुर मोर्चाबाबत नेमकेपणाने दिशा ठरवण्यासाठी पुन्हा औरंगाबादेतच छत्रपती कॉलेजमध्ये बैठक घेण्यात आली. याचवेळी औरंगाबादेत "मराठा क्रांती मूक मोर्चा'चे राज्यव्यापी कार्यालय असावे, यावर शिक्‍कामोर्तब झाले. त्याप्रमाणे सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाणी पाच महिने पुर्ण होण्याअगोदरच कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर मुंबईत 31 जानेवारी 2018 ला शेवटचे अस्त्र म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. त्यासाठी केंद्रबिंदू ठरले ते औरंगाबाद. त्यामुळेच मराठा क्रांती मूक मोर्चा आणि औरंगाबाद हे आदर्श मोर्चाचे सुत्रच बनले होते.

आजवरच्या इतिहासात मोर्चांनी आगळीवेगळी रचना यशस्वीपणे राबविणाऱ्या औरंगाबादेतील मोर्चेकऱ्यांनी एका अर्थाने सर्व समालाच दिशा दिली. अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. 

मराठा क्रांती मोर्चा
9 ऑगस्ट 2016 पहिला मराठा क्रांती मुकमोर्चाला सुरवात 
31 जानेवारी 2017 राज्यव्यारी चक्‍काजाम आंदोलन 
18 सप्टेंबर 2016 नांदेड येथे विराट मुकमोर्चा 
3 सप्टेबर 2016 परभणी येथे विराट मुकमोर्चा 
23 जुलै 2018 हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे बलिदान 
13 जुलै 2017 कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ लातूर येथे कॅन्डल मार्च 
29 जुन 2018 तुळजाभवानी मातेच्या महाव्दारासमोर जागरण -गोंधळ 
18 जुलै 2018 रोजी परळी वैद्यनाथ येथे राज्यातील पहिला मराठा क्रांती ठोकमोर्चा 
19 जुलै 2018 रोजीपासून परळीतील ठोकमोर्चाचे लोण राज्यभर पसरले 
20 जुलै 2018 रोजीपासून औरंगाबादेत ठिय्या आंदोलनास सुरवात 
8 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा 
9 ऑगस्ट 2018 रोजी कडकडीत बंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com