esakal | कळमनुरीत मनसेच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

ANDOLAN

कळमनुरीत मनसेच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी : कोरोना संकटाने बंद असलेले सर्व व्यवहार, राजकीय सभा यात्रा, दारूची दुकाने पूर्ववत सुरू केल्यानंतरही राज्य शासनाने अद्याप मंदिर बंद ठेवली आहेत त्यामुळे भाविका बरोबरच मंदिराच्या परिसरात असलेल्या विक्रेत्यांची मागील काळापासून मोठी गैरसोय झाली आहे शासनाने तातडीने मंदिर सुरू करावीत या मागणीकरिता शनिवार ता.४ मनसेच्या वतीने येथील विराट हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. आजारामुळे बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने मंदिर उघडण्यास सध्या परवानगी दिली नाही त्यामुळे मंदिर परिसरात अवलंबून असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली आहे त्यामुळे शासनाने बंद असलेले मंदिरे सुरू करावी या मागणीकरिता मनसेच्या वतीने विराट मारुती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

मागील काही काळापासून मंदिर बंद आहेत मात्र आता सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होत असताना राज्य शासनाने राजकीय सभा यात्रा दारूची दुकाने इतर व्यापार व सर्व व्यवहारांना पूर्ववत परवानगी देऊन दुकाने चालू केली आहेत राजकीय कार्यक्रमांनाही ही परवानगी देण्यात आली आहे मात्र मंदिर सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात येत नाही त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना पायरीचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे.

दुसऱ्या बाजूला मागील अनेक दिवसापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिराच्या परिसरात असलेल्या किरकोळ विक्रेत्यांचा व्यापार संकटात सापडला असून या विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे राज्य शासनाने तातडीने मंदिर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा या मागणीकरिता मनसेच्या वतीने येथील बंद असलेल्या विराट हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी विनोद बांगर, सोनू वाढवे, सादिक पठाण, संतोष कदम, भाऊराव पतंगे, मुरलीधर वायदेशकर, राहुल सावंत, श्याम खाडे, दिगंबर शृंगारे, विनोद मुंडे, पांडुरंग पतंगे, शंकर मगर, संदीप देशमुख, पंडित पतंगे, विजय पवार ,किरण चौथमल, सोमनाथ शिंदे, कपिल बलखंडे, किशोर हरण, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

आंदोलनस्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे, कर्मचारी संजय राठोड ,रवी बांगर ,माजित सय्यद, प्रशांत शिंदे ,शशिकांत भिसे, यांनी बंदोबस्त ठेवला होता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरासमोर आंदोलन केल्यानंतर मंदिर उघडण्यास संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

loading image
go to top