पावसाळ्यात विजेपासून सावध राहा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - पावसाळ्यात वादळीवारा व अतिवृष्टीमध्ये तारा तुटून किंवा पोल पडल्याने अपघाताची शक्‍यता असते. शिवाय या काळात घरगुती उपकरांपासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. त्याचप्रमाणे झाडे पडल्याने विद्युत खांब वाकतात किंवा जमिनीवर पडतात. त्यामुळे वीजप्रवाह उतरण्याची शक्‍यता अधिक असते. अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून सावध राहणे आवश्‍यक आहे. 

अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीजतारा, खांब, रस्त्यांच्या बाजूंचे फिडर, पिलर, ट्रान्स्फॉर्मर्सचे लोखंडी कुंपण, फ्यूजबॉक्‍स; तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपांचा स्विचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्‍यता असते. नागरिकांनी महावितरणच्या टोल फ्री सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

तत्काळ साधा संपर्क 
शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी चोवीस तास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ हे दोन टोल फ्री क्रंमाक आहेत. शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष (७८७५७५६६५२, ०२४०२३४३१२४) यावर संपर्क करावा. 

काय घ्यावी काळजी?
घरातील वीजपुरवठ्याला आवश्‍यक आर्थिंग करून घ्या. 
घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्विच तत्काळ बंद करावा.
टिनपत्र्यांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 
विजेच्या खांबांना किंवा स्टेला जनावरे बांधू नयेत.
खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. 
घरावरील डिश किंवा ॲन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत. 
ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये. 

Web Title: Beware of electricity during the monsoon