Bharat Bandh : चक्क बाहुबली अन्‌ कटप्पा उतरले रस्त्यावर (व्हिडिओ)

लातूर - इंधन दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा रस्त्यावर उतरले होते. ‘अच्छे दिन कहाँ गये’ अशा घोषणाही त्यांनी या वेळी दिल्या.
लातूर - इंधन दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा रस्त्यावर उतरले होते. ‘अच्छे दिन कहाँ गये’ अशा घोषणाही त्यांनी या वेळी दिल्या.

लातूर - इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी देशभर आणि राज्यभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत; पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडू, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है’ अशी घोषणा दिली.

सरकारच्या धोरणाविरोधात देशभर बंद पुकारण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. लातुरात तर चक्क बाहुबली पाठीवर सिलिंडर घेऊन महागाईकडे लक्ष वेधून घेत आहे. सरकारने बाहुबलीचेही म्हणने ऐकून घेतले नाही तर शेवटी मी आहेच, असे कटप्पा आंदोलनात सांगत होते. या दोघांबरोबरच सरकारला जागे करण्यासाठी पोतराज, आराधी, वासुदेवही रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकारच्या धोरणांचा कडाडून निषेध केला. 

रत्नदीप आजनीकर यांनी बाहुबलीचा, तर अभिजित ओहाळ यांनी कटप्पाचा वेश परिधान केला होता. राजू गवळी यांनी वासुदेवाचा, तर प्रवीण कांबळे यांनी पोतदाराच्या वेशात इंधन दरवाढीविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या. जनता महागाईने त्रस्त झाली आहे; पण सरकार मात्र मस्त जगत आहे. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत त्यांनी पालिकेसमोरच केलेले अनोखे आंदोलन लातूरकरांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. त्यानंतर शिवाजी चौक, गांधी चौक, बसस्थानक परिसर, गंजगोलाई या भागात आंदोलन करण्यात आले. ‘कहाँ गये भाई कहाँ गये, अच्छे दिन कहाँ गये’ अशा घोषणाही त्यांनी या वेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com