दुष्काळी आष्टीत ‘भारती’सारखे प्रकल्प गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

आष्टी - आष्टी तालुक्‍यासारख्या दुष्काळी भागात रोजगाराची संधी निर्माण करणारे भारती फूड प्रोडक्‍टसारखे प्रकल्प गरजेचे असून, त्यादृष्टीने तालुक्‍याला भरीव सहकार्य करू, असे आश्वासन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

उद्योजक तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक दिलीप हंबर्डे यांच्या भारती ग्लोबल फूड प्रोडक्‍ट्‌स या सुमारे ४० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. पाच) सायंकाळी मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव धोंडे होते. 

आमदार साहेबराव दरेकर, भाजपनेते बाळासाहेब आजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, तालुकाध्यक्ष ॲड. हनुमंत थोरवे, भाजयुमोचे आष्टी तालुकाध्यक्ष सतीश शिंदे, भाऊसाहेब लटपटे, राम खाडे, डॉ. शैलजा गर्जे, गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज, लालासाहेब कुमकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आमदार मुंडे यांनी आष्टीसह सर्व बीड जिल्ह्यात अनेक कामे प्रगतिपथावर असून, रेल्वेसाठी विशेष पाठपुरावा करून ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आमदार धोंडे म्हणाले की, पालकमंत्री मुंडे यांच्या माध्यमातून मतदारसंघाला भरघोस निधी मिळत असून, त्यातून रस्त्यांसह अनेक कामांना गती आली आहे. विजय गोल्हार, रमेश पोकळे, सतीश शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. 

हंबर्डे यांचा भाजप प्रवेश
जिल्हा बॅंकेचे संचालक दिलीप हंबर्डे यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पालकमंत्री मुंडे व आमदार धोंडे यांनी स्वागत केले. 

आचारसंहितेचा अडसर
मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांबरोबरच शहरात उभारलेल्या दोन कोटी खर्चाच्या ट्रॉमा केअर युनिटचे लोकार्पण आज होणार होते; परंतु शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता आजपासून सुरू झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

Web Title: bharti food product