पुणे : भाटघरला 125, तर आळंदीला 76 मिलिमीटर पाऊस

rain
rain

पुणे : शहर आणि जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही पण मध्यरात्रीनंतर भोर, वेल्हा तालुक्यातील त्यानंतर शहरातील कात्रज, कोंढवा, हडपसर, येरवडा आणि आळंदी आणि धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. भाटघर येथे 125 तर आळंदी येथे 76 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण परिसरात सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार धरणात पाऊसच झाला नव्हता. रात्री बारा वाजता रिमझिम पाऊस पडत होता. त्यानंतर अडीच तीनच्या सुमारास पावसाचा वेग वाढला. सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे 37, पानशेत 57, वरसगाव 56 टेमघर येथे 60 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरात 125 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आळंदी 76, शिरगाव 73, कात्रज बोगदा शिंदेवाडी 65, वेल्हे 62, गुंजवणी 62, भट्टी वाघदारा 57, येरवडा 57, शिरकोली 53, आंबेकर 52, मुळशी 47, नाझरे 44, पवना 39, ताम्हिणी 39, कुरुंजे 37, नीरा देवघर 36, वीर 35, कासारसाई 30, खामगाव 18 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

शहरात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटर मध्ये 
कात्रज - 56, 
कोंढवा येवलेवाडी 52
येरवडा संगमवाडी 44
औंध 41 
कर्वेनगर 65
नगररोड वडगाव शेरी 45
हडपसर / मुंढवा-50
ढोले पाटील -6
कसबा / विश्रामबाग वाडा -45
कोथरूड -67
सहकार नगर / धनकवडी-47
घोले रोड -68 
महापालिका भवन - 42

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com