भोकरदन : भोकरदनमध्ये युवकाचा खून

सरकीच्या पऱ्हाट्या टाकून प्रेत जाळण्याचा प्रयत्न
Bhagvan Raju Talekar
Bhagvan Raju Talekarsakal

भोकरदन : भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळील एका शेतात शनिवारी (ता.19) सकाळी युवकाचा डोके ठेचलेला मृतदेह आढळून आला आहे. या युवकाचा खून झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, प्रेतावर सरकीच्या पऱ्हाट्या आढळून आल्याने प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचीही चर्चा आहे. भगवान राजू तळेकर (वय 22) रा.आलापूर (तालुका भोकरदन) असे मृतदेह आढळून आलेल्या मयत युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील आलापूर येथील भगवान राजू तळेकर हा युवक खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता.

शुक्रवारी (ता.18) रंगपंचमीच्या दिवशी तो सकाळपासून घरातून बाहेर गेलेला होता. शनिवारी सकाळी भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळील एका शेतात मृतदेह असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस नाईक गणेश पायघन, पोलिस कर्मचारी, रामेश्वर सिनकर, अभिजित वायकोस, शेख आसेफ, दीपक इंगळे, समाधान जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी अज्ञात आरोपींनी भगवान तळेकर याच्या चेहऱ्यावर मोठ्या शत्र किंवा दगडाचा वापर करून चेहरा विद्रुप केला असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्ड मुळे त्याची ओळख पटली असून, पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सरकीच्या पऱ्हाट्या टाकून प्रेत जाळण्याचा प्रयत्न?

घटनास्थळी प्रेतावर सरकीच्या पऱ्हाट्या टाकून प्रेत झाकण्यात आले होते. त्यामुळे आरोपींकडून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला गेला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com