भोकरदनमध्ये अस्वलाचा धुमाकूळ; तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

भोकरदन - शहराजवळील फत्तेपूर गावाच्या शिवारात मंगळवारी पाण्याच्या शोधात भरकटलेल्या एका अस्वलाने धुमाकूळ घातला.

भोकरदन - शहराजवळील फत्तेपूर गावाच्या शिवारात मंगळवारी पाण्याच्या शोधात भरकटलेल्या एका अस्वलाने धुमाकूळ घातला.

अस्वलाने अचानक चढविलेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन तरुण जखमी झाले. अस्वलाने विजय अशोक सपकाळ (वय 16), रुख्मणबाई सारंगधर तळेकर (वय 45), शुभम संजय गायकवाड (वय 19) अशी जखमींची नावे आहेत. भोकरदन येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर अस्वलाचा शोध घेतला. पिंजऱ्याजवळ दोन वेळेस अस्वल आले. मात्र, वन विभागाचा प्रयत्न अपयशी ठरला. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल.

Web Title: bhokardan news bear attack three injured