भोकरदन तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

भोकरदन - नांजा (ता. भोकरदन) येथील शेतकरी पुंजाराम बंडू सोनुने (वय 52) यांनी शनिवारी (ता. 20) रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोकरदन - नांजा (ता. भोकरदन) येथील शेतकरी पुंजाराम बंडू सोनुने (वय 52) यांनी शनिवारी (ता. 20) रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भोकरदन पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बोंडअळीमुळे कापसाचे उत्पादन न झाल्यामुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

Web Title: bhokardan news farmer suicide