एकाच दिवशी तेराशे घरकुलांचे भूमिपूजन

bhoomipujan of the thirteenth hundred house
bhoomipujan of the thirteenth hundred house

लातूर : गरीबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या संकल्पनेतून सोमवारी (ता. 2) आवास दिन साजरा करत एकाच दिवशी सुमारे तेराशे घरकुलांचे भूमिपूजन केले. तर घरकूल बांधलेल्या 200 घरकुलांत लाभार्थींचा गृहप्रवेश घडवून आणला. जिल्हा परिषदेने खास घरकुलांसाठी राज्यात पहिल्यांदाच राबवलेल्या या व्यापक मोहिमेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिवसभर  घरकुलाचाच पाढा वाचत अपूर्ण व मंजूर घरकुलाच्या कामांना चालना दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेतून ग्रामीण भागातील गरजूंना घरकुल बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, घरकुल मंजूर करूनही अनेक लाभार्थी त्याचे बांधकाम करत नाहीत. जिल्ह्यात 2015 - 2016 पर्यंत तीन हजार 117 अपूर्ण घरकुले होती. त्यानंतर विविध कारणांमुळे 2016 - 2017, 2017 - 2018 आणि 2018 - 2019 या वर्षातही अपूर्ण तसेच मंजूर परंतू प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झालेल्या घरकुलांची संख्या वाढत केली. सध्या जिल्ह्यात बारा हजार 957 अपूर्ण तर एक हजार 485 मंजूर परंतू प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झालेल्या घरकुलांची संख्या आहे. तब्बल चौदा हजार 442 घरकुलांचे काम रखडले होते. 

अनेक प्रयत्न करूनही घरकुलांचे काम सुरू होत नव्हती. या घरकुलांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने सोमवारी खास आवास दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देऊन एकाच दिवशी बाराशे घरकूलांचे भूमिपूजन व दोनशे घरकुलांत गृहप्रवेश करण्याचे नियोजन केले. उपक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले. त्याचा परिणाम दिवसभरात एक हजार 309 घरकुलांचे भूमिपूजन पार पडले आणि 205 घरकुलांमध्ये लाभार्थींचा गृहप्रवेश झाला. विविध ठिकाणी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले तर लाभार्थींच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश करण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी सांगितले.  

जिल्ह्यात मोठ्या संख्येने अपूर्ण असलेल्या तसेच मंजूर घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ईनटकर यांच्या संकल्पनेतून आवास दिनाचा उपक्रम राबवण्यात आला. गाव पातळीपासून जिल्हा पातळीवरील सर्व घटकांनी घेतलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून योगदान दिले. त्यामुळे एकाच दिवशी तेराशे घरकुलांचे भूमिपूजन करून दोनशे लाभार्थींचा गृहप्रवेश झाला. यामुळे अनेक वर्षापासून रेंगाळगेल्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला. या मोहिमेत यापुढेही सातत्य ठेऊन गरजूंना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहेत.

- संतोष जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com