उमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास!

उमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास!

उमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यातून त्यांनी सायकलीचा प्रवास मानवाच्या शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त असल्याचा संदेशही दिला आहे.

व्यायामाने आरोग्य सुदृढ राहावे, मनाची एकाग्रता वाढावी, यासाठी डॉ. मोरे, श्री. मदनसुरे, राजेंद्र मुगळे यांच्या पुढाकारातून ‘सायकल चालवा- आरोग्य सुदृढ ठेवा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. 

दरम्यान, डॉ. प्रशांत मोरे, श्री. अनिल मदनसुरे यांनी १२ जानेवारीला पहाटे चार वाजता प्रवास सुरू केला होता. दररोज तीनशे किलोमीटरचे उद्दिष्ट पूर्ण करीत ताशी २५ किलोमीटर वेगाने दररोज १८ ते २० तासांचा सायकल प्रवास त्यांनी केला. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान सायकल चालविण्याच्या विविध स्पर्धांमधून त्यांनी नावलौकिक केला आहे.

कन्याकुमारीलाही जाणार
आगामी काळात कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास करण्याचा संकल्प या दोन्ही सायकलवीरांनी केला आहे. या दोन्ही सायकलस्वारांचे शहरातील इंडिएन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्‍लब, डॉ. प्रशांत मोरे मित्रमंडळ, आरोग्यनगर मित्रमंडळाने नुकताच सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com