बिडकीनचे ‘डिफेन्स हब’ म्हणून ‘प्रोजेक्‍शन’

Alkesh-Sharma
Alkesh-Sharma

औरंगाबाद - देशात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक शहरे उभारण्याची कामे नियोजित वेळेपेक्षाही पुढे आहेत. औरंगाबादलगत उभारण्यात येणाऱ्या बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीला ‘डिफेन्स हब’ म्हणून प्रोजेक्‍ट केले जाणार असल्याची माहिती दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (डीएमआयसीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा यांनी ‘सकाळ’ला दिली. शेंद्रा आणि बिडकीन येथील कामांचा त्यांनी पहिल्यांदाच औरंगाबादेत येत शनिवारी (ता. सात) आढावा घेतला.  

बिडकीनमध्ये कामांचा वेग मोठा आहे. बिडकीनला उपलब्ध जमीन पाहता ‘डिफेन्स हब’ म्हणून सगळीकडे प्रोजेक्‍ट केले जाणार असल्याची माहिती अल्केश शर्मा यांनी दिली. 

शेंद्रा येथेही या कंपन्यांना जागा देणे शक्‍य आहे, तर बिडकीनला ५०० एकरांपर्यंतची जमीन आम्हाला एका कंपनीला देणे शक्‍य आहे. देशी संरक्षण क्षेत्रातील कंपन्या परदेशी कंपन्यांच्या साथीने गुंतवणुकीवर भर देत आहेत. त्या माध्यमातून बिडकीनला या क्षेत्रातील कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कंपन्यांनी सुचवलेले बदल आत्मसात
औषधनिर्माण, अन्नप्रक्रिया, संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यांना आपली गुंतवणूक देशातील डीएमआयसी प्रकल्पांमध्ये करताना काही अपेक्षा आहेत. फार्मा कंपन्यांना पाण्याची शुद्धता आणि दर्जा महत्त्वाचा आहे, अन्नप्रक्रिया कंपन्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा हवी, आयटी कंपन्यांनी कॉमन फॅसिलिटी सेंटरची गरज व्यक्त केली आहे. कंपन्यांनी सुचवलेले हे बदल केले जात असून त्यांचा आराखड्यात समावेशही केला जात असल्याचे अल्केश शर्मा यांनी सांगितले.

शेंद्रा हे देशातील पहिले स्मार्ट शहर
देशात डीएमआयसीअंतर्गत आठ स्मार्ट सिटी वसविण्याचा आराखडा आहे. त्यातील पाच शहरांचे काम सध्या सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह सर्व सुविधांनी युक्त आणि सर्वप्रथम कार्यरत होणारे शेंद्रा हे सर्वात पहिले शहर ठरणार असल्याची माहिती अल्केश शर्मा यांनी दिली.

स्किल, कन्व्हेन्शन सेंटरसाठी प्रायव्हेट पार्टनर
स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करण्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटरशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबाबत धोरण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी औद्योगिक संघटना आणि कंपन्यांशीही चर्चा केली जात असून जागा देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे श्री. शर्मा म्हणाले. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून कंपन्यांची सोय होण्यासाठी पन्नास एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. कंपन्यांचा ओघ आणि मागणी वाढेल तेव्हा भविष्यात त्याचेही निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी कोणी खासगी संस्थेने पुढाकार घ्यावा आणि त्याची उभारणी करण्यावरही विचार शक्‍य असल्याचे अल्केश शर्मा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com