बॅंकेला आग लागून मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

तुळजापूर - तुळजापुरातील आर्य चौकानजीकच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत रविवारी (ता. 10) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रविवारी पहाटे इमारतीमधून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबत व्यवस्थापक नंदकुमार कुतवळ यांना माहिती दिली. कुतवळ तातडीने बॅंकेत आले. वीज वितरण कंपनीने बॅंक आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित केला. बॅंकेतील संगणक तसेच फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्यानंतर बॅंकेच्या खिडक्‍या फोडण्यात आल्या. तुळजापूर नगरपालिका आणि उस्मानाबादेतून आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे पहाटे साडेचारच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. यात बॅंकेची स्ट्रॉंग रूम सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Big Loss by Bank Fire