बीडमध्ये खासदार मुंडेंच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

बीड : सावरगाव (ता. पाटोदा) येथे आज गुरुवारी (ता. १८) दुपारी होत असलेल्या दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथगड ते सावरगाव घाट अशा निघालेल्या वाहनफेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी फेरीचे नेतृत्व केले.

संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने दुसरा दसरा मेळावा होत आहे. संत भगवान बाबांच्या स्मारकाचे लोकार्पणही होणार आहे. दरम्यान, दुपारी होत असलेल्या मेळाव्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन फेरी निघाली आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळीजवळील गोपीनाथगडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी फेरीला सुरवात केली. ही फेरी सावरगाव घाट येथे पोचणार आहे.

दरम्यान, वाहनफेरीचे कार्यकर्त्यांनी जागोजाग जंगी स्वागत केले. डॉ. मुंडे यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तर सेल्फी काढून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

Web Title: A big response to the rally in the presence of MP Munde in Beed