सोळावं वरीस धोक्‍याच... बालवयातच 'मास्टर-की' 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - 'सोळावं वरीस धोक्‍याच' असं म्हणतात, ते बहुदा खोटं नसावं. पाय घसरण्याचचं हे वय असं एका अर्थानेच म्हटलं जातं. या लहानग्या वयात मास्टर "माईंड' तेजतर्रार असेल तर नवल करायला नको. असंच काहीसं औरंगाबादेत घडलं आणि बालवयातच त्याने मास्टर "की' मिळविली. त्याची शाळा सुटली अन्‌ मग नियतही हुकली. 

औरंगाबादच्या हुसेन कॉलनीतील एका सोळा वर्षाच्या मुलाची ही कहाणी. याच भागात एका खोलीत भाड्याने आईसोबत तो राहतो. अजाणतेपणी त्याचे वडील गेले. मग आईने मोलमुजरी, धुणी-भांडी करुन पोटाची खळगी भरायला सुरुवात केली. त्याने महापालिकेच्या शाळेत कशीबशी पाचवी काढली. गरीबी, पिचलेपणाने पुढचं शिक्षण थांबवलं. शिक्षण घे अन्‌ मोठा हो असं घरातल्या कुणीही सांगितलं नाही, तशी परिस्थिती, वातवरणही घरात नव्हतं. फक्त टिचभर पोट भरणे एवढाच घरातला प्रपंच. मग शिक्षणातून रस गेला. तीन-चार वर्षे उनाडक्‍या केल्यानंतर अयोग्य साथसंगत मिळत गेली. शिक्षण नाही, योग्य मार्गदर्शन नाही, समुपदेशन नाही. अशातच तो गर्तेत अडकला गेला कधी केटरींग तर कधी पडेल ती कामे केली. नंतर मात्र झटपट पैसा कसा मिळेल याचा तो विचार करु लागला. 
 

निवडला सॉफ्ट मार्ग 
पैसे मिळतील कसे याचाच तो विचार करायचा. गाडी चोरायची, ती विक्री करुन पैसे मिळवायचे, असा प्रकार त्याने सुरू केला. मोठ्या हुशारीने चिश्‍तिया चौक येथील चावी विक्रेत्याकडे तो महिन्यापूर्वी गेला. "मास्टर-की' बनविली, अर्धे काम फत्ते झाल्यानंतर सहजरित्या तीन दुचाकी त्याने लंपास केल्या. दुचाकी चोरीत "सराईत' झाल्यानंतर मात्र या बाल मास्टरला पोलिसांनी उस्मानपुरा येथून पकडले. या "उद्योगा'तून तीन दुचाकी पळवल्याचेही त्याने कबुल केल्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी सांगितले. 

ही आत्मपरिक्षणाची वेळ आहे. पुढची पिढी तयार करताना आपण कसे वागतो. मुलांना पोषक ठरेल असे वातावरण व शिक्षण देतो का हे पडताळण्याची वेळ आली आहे. मुलांची दिशाहिनता वाढली. कष्टाची तयारी नाही. त्यांच्या गरजा पूर्ण करताना पालक म्हणून आपण काय करतो यावरही विचार करायला हवा.'' 

डॉ. मोनाली देशपांडे, समुपदेशक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com