हिंगोली : दहा तासांच्या कोम्बींग ऑपरेशननंतर दूचाकी चोर जाळ्यात

मंगेश शेवाळकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या दहा तासाच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सोमवारी ( ता. १९) सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात सापडला. त्यानंतर पोलिसांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या दहा तासाच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सोमवारी ( ता. १९) सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात सापडला. त्यानंतर पोलिसांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला.

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देगलुर ( जि. नांदेड) येथील देविदास बाबुराव कांबळे याला शुक्रवार ( ता. १६) ताब्यात घेतले. त्याने नांदेड शहरातील अनेक दुचाकी चोरून हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरीचा आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवीदास कांबळे याला आखाडा बाळापुर पोलिसांच्या हवाली केले होते. आखाडा बाळापुर पोलिसांनी रविवारी (ता. १८) त्याला सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर रात्री परत आखाडा बाळापूर येथे आणत असतांना कळमनुरी जवळ माळेगाव फाटा येथून त्याने पोलीस वाहनातून उडी मारून पलायन केले. पोलिस वाहनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो सापडला नाही.

दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक  यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक  किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लेकुळे संदीप जाधव, आशिष उंबरकर विठ्ठल कोळेकर, भगवान आडे, गणेश जाधव तसेच आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने मोरवाडी गावकऱ्यांच्या मदतीने रात्री दहा वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यामध्ये परिसरातील शेताला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. आज सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात पिकांमध्ये लपून बसलेला तो आढळून आला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाली लातूर ता सापडल्याने आखाडा बाळापूर पोलिसांसह हिंगोली पोलीस दल आणि सुटकेचा निश्वास सोडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bike Thieves Arrested and accepted the crime