Phulambri
Phulambri

ग्रामस्वच्छता अभियानात बिल्डा गावाला तृतीय पुरस्कार

फुलंब्री : तालुक्यातील बिल्डा गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पवणीत कौर, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

औरंगाबाद शहरापासून उत्तर दिशेला अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीतीरावर बिल्डा गाव वसलेले आहे. या गावाची अडीच हजार लोकसंख्या आहेत. गावाचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन व संवरक्षण करून समृद्ध व संपन्न बिल्डा गावाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने गावकरी प्रयत्नशील आहेत. बिल्डा गावाला 2011 मध्ये भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

स्मार्ट ग्राम निवडीसाठीच्या निकषानुसार गुणांकन देण्यासाठी गावात स्मार्ट विषयक सर्व बाबी पूर्ण होऊन वयक्तिक शौचालय सुविधा व वापर यासाठी गावाला निर्मल ग्राम पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तसेच पाणी गुणवत्ता व तपासणीचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापन व त्यापासून खतनिर्मिती, स्वप्नपूर्ती शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या माध्यमातुन आर.ओ. प्लांट आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियानासाठी वयक्तिक शौचालयाची सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीत शौचालय, पाणी गुणवत्ता तपासणी, घरघुती नळजोडणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आदी स्वच्छतेविषयीचे उपक्रम राबवून बिल्डा गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनी औरंगाबाद येथे या पुरस्काराचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या पुरस्कारातील बक्षीस व प्रमाणपत्र बिल्डा येथील सरपंच कांताताई जाधव, उपसरपंच सुरेश मुळे, सदस्य नारायण चव्हाण, संदीप पगडे, राजू बोलकर, रुबिना शाह, नंदा बोलकर, विमल बोलकर ,चंद्रभागा पेटारे,लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक भागीनाथ पेहेरकर, डॉ.इसाक शहा, कचरू गायके, रेवाजी चव्हाण,जगन्नाथ जाधव, रतन पगडे, दौलत पेटारे, महेबुब शहा व ग्राम स्वच्छता अभियान अध्यक्ष सांडू जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com