मांडवातच नवरदेवाने सोडलेल्या तरुणीला भेटला दुसरा जोडीदार

रामदास साबळे
मंगळवार, 8 मे 2018

वधुकडील मंडळीही संतप्त झाली आणि कुरबुरीचे रुपांतर भांडणात झाले. दोन्ही बाजूने एकमेकांना तुंबळ हाणामारी झाल्यानंतर हा वाद युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गेला.

केज (जि. बीड) - लग्नात नवरदेवाचा बुट आणि कट्यार चोरण्याच्या कारणावरुन वर - वधू पक्षात तुंबळ हाणामारी झाल्याने नवरदेवाने मांडवातून चक्क नवरीलाच नेण्यास नकार दिला. मात्र, नियतिने तिच्या नशिबात लिहीलेला जोडीदार अखेर तिला मिळाला.

घडली घटना अशी, तालुक्यातील कुंभेफळ येथील तरुणीचा रविवारी (ता. 6) तुळजापूर येथील तरुणाशी विवाह झाला. मुस्लिम पद्धतीने विधी सुरु असताना नवरीच्या नऊ वर्षीय भावाने नव्या प्रथेप्रमाणे नवरदेवाचा बुट आणि कट्यार चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवरदेव आणि त्याच्या भावाने लहान मुलाला मारहाण केली. यामुळे वधुकडील मंडळीही संतप्त झाली आणि कुरबुरीचे रुपांतर भांडणात झाले. दोन्ही बाजूने एकमेकांना तुंबळ हाणामारी झाल्यानंतर हा वाद युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गेला.

सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला. दरम्यान, नवरीसाठी पुन्हा वरशोध सुरु झाला आणि अंबाजोगाई येथील व सायगावमध्ये राहणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा निकाह झाला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bizzare reason for cancelation of marriage