esakal | भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबळ आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

जालना - भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासाठी संबळ आंदोलन करण्यात आले.

भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबळ आंदोलन

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation) संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक झाले असून बुधवारी (ता.१५) जालन्यात भाजपच्या (BJP) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबळ नाद आंदोलन (Jalna) करून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: सराफा व्यापाऱ्याला लुटले ? फिर्याद देण्यास मात्र नकार

यावेळी ओबीसीचे राजकिय आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. राज्य शासनाने ओबीसी समाजावरील अन्य झाला असून राज्य शासनाचा निषेधार्थ भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबळ आंदोलन केले आहे. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त।तैनात करण्यात आला होता.

loading image
go to top