टक्कल करून भाजपचे जालन्यात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलकांनी जनतेला सुविधा देण्यात राज्य सरकार असमर्थ ठरल्याची टिका तोंडाला काळे मास्क लावून, हाताला काळी फीत बांधून व  फलक धरून आंदोलन केले. यावेळी टक्कल करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

जालना - राज्य शासनाने राज्यातील जनतेला कोरोना संकटात सुविधा देण्यात असमर्थ ठरले असून यापुढेही राज्य सरकारमध्ये सुधारणा झाली नाहीतर भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिला. दरम्यान, जालना जिल्हा भाजपच्या वतीने शुक्रवारी (ता.२२) सकाळी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी टक्कल करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलकांनी जनतेला सुविधा देण्यात राज्य सरकार असमर्थ ठरल्याची टिका तोंडाला काळे मास्क लावून, हाताला काळी फीत बांधून व  फलक धरून आंदोलन केले.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार दानवे म्हणाले की, कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची संख्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे, गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील ठाकरे सरकार यामध्ये कोणत्याही उपाययोजना करण्यास तयार नाही. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने जनतेला आर्थिक मदत करावी व शेतकरी व कामगार व सामान्य जनतेसाठी विशेष पॅकेज देऊन त्यांना दिलासा द्यावा, यापुढेही जर राज्य सरकारने अशाच प्रकारचे दिरंगाई केली तर भाजप यापुढे आंदोलन तीव्र करेल, असा इशारा दिला. 

हेही वाचा : बांधकामे ठप्प झाल्याने कामगारांचे हाल

आंदोलनाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष राजेश राऊत, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, बद्रीनाथ पठाडे, धनराज काबलीये, बाबासाहेब कोलते, वीरेंद्र धोका, कपिल दहेकर, विष्णू डोंगरे, रामप्रसाद मुंदडा अमोल कारंजेकर, मयूर ठाकूर, रोहित नलावडे, दिनेश व्यास, हरिभाऊ नाटकर, दत्ता जाधव, शेख इमाम आदींची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP criticizes state government